वेगाने बदलणा-या आजच्या जगात रोजगाराचे स्वरूप, रोजगारसंधी व कौशल्याचे निकष बदलत आहेत. फार जुनी गोष्ट नाही, अगदी वीस-तीस वर्षांपूर्वीपर्यंत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणा-यांना जॉब मार्केट मध्ये ब-यापैकी डिमांड होती. आता जमाना आहे प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा. आजच्या हायटेक जगात Programming किंवा Coding हे एक Essential Skill बनले आहे. म्हणूनच ऊर्जा युवा प्रतिष्ठान व शिवसेना आयटी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही शाळकरी मुलांसाठी (तसेच कोडींग शिकून घरबसल्या (Work from Home) आर्थिक उन्नती करू इच्छिणा-या गृहिणींसाठी) Coding Literacy Initiative हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहोत, तो देखील आपल्या मातृभेतून अर्थात मराठीतून.
येणा-या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे अनेक कामे सुलभ होतील, तर अनेक व्यावसायिक कौशल्ये कालबाह्य (Outdated) होतील. मात्र आर्टिफिशल इंटेलिजंस, डेटा सायन्स, मशिन लर्निंग, ब्लाॅकचेन आदी आयटी क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नाॅलाॅजीजचा पाया म्हणून ओळखल्या जाणा-या पायथन (PYTHON) ह्या प्रोग्रामिंग लॅन्ग्वेजचे प्रशिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक गृहिणीला, प्रत्येक तरुणाला देऊन त्यांना रोजगारक्षम व Future-Ready बनविले तर भारताला महाशक्ती (Superpower) बनवण्याचे आपले स्वप्न सत्यात उतरण्यास वेळ लागणार नाही. सोबतच विद्यार्थीदशेतच कोडींग शिकल्यामुळे मुलांमध्ये लाॅजिकल थिंकिंग, प्राॅब्लम साॅल्व्हींग व क्रिएटीव्हीटी वाढीस लागेल.
म्हणूनच कोडींग लिटरसी ह्या उपक्रमअंतर्गत सर्वप्रथम ‘Python for Beginners’ हा एक आठवड्याचा Online Course आपण ह्या संकेतस्थळावरून सादर करीत आहोत, तेही पूर्णतः: नि:शुल्क. Beginners Course यशस्वीरित्या पूर्ण कारणा-यांना एक ऑनलाईन टेस्ट घेऊन सर्टिफिकेट्स दिली जातील व जे पुढे शिकण्यास उत्सुक असतील त्यांना Advanced Course देखील (नि:शुल्क) दिला जाईल.
कृपया ऑनलाईन नाव नोंदणी (Enroll) करण्यापूर्वी पुढे दिलेल्या Google Form मध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरावी, जेणेकरून प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच भविष्यात आम्ही घेऊन येत असलेल्या कोर्सेसची माहिती देण्यासाठी आपणास संपर्क करणे सुलभ होईल: FORM